Home / News / आसाराम बापू जेलमधून बाहेर खोपोलीतील रुग्णालयात उपचार

आसाराम बापू जेलमधून बाहेर खोपोलीतील रुग्णालयात उपचार

रायगड – अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. राजस्थान...

By: E-Paper Navakal

रायगड – अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. राजस्थान हायकोर्टाने १३ ऑगस्टला आसाराम बापूला उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर २ आठवड्यांनंतर त्याला रायगडच्या खोपोली येथील रुग्णालयात हृदयाच्या संबंधित उपचारासाठी आणले.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूला रात्री ८ वाजता खोपोलीच्या आयुर्वेदिक रुग्णालयाच्या बहुविद्याशाखीय कार्डियाक केअर क्लिनिकमध्ये पोलीस बंदोबस्तात आणले. पुढील ७ दिवस त्याच्यावर हृदयविकारावर या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे.

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी हायकोर्टाने आसाराम बापूला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्याच्यासोबत प्रवासात ४ पोलीस असतील आणि त्याच्यासोबत दोन मदतनीस ठेवण्याची परवानगीही दिली होती. त्यांना पुण्यातील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च त्यांनाच करावा लागणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या