Home / News / उंच इमारतींना यापुढे व्हर्टिकल फॉरेस्टची सक्ती

उंच इमारतींना यापुढे व्हर्टिकल फॉरेस्टची सक्ती

मडगाव – राज्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विविध ठिकाणी सुमारे ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर पालिका क्षेत्रांतही...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

मडगाव – राज्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विविध ठिकाणी सुमारे ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर पालिका क्षेत्रांतही जागा उपलब्ध असल्यास वृक्षारोपण केले जाईल . त्याचबरोबर २५० चटई निर्देशांकापेक्षा (एफएसआय) जास्त उंच इमारतींना व्हर्टिकल फॉरेस्ट ( उभी हिरवळ ) केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मंजुरी मिळणार नाही, अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

मडगाव येथील सोनसडो कचरा यार्डात कमी जागेत दाट जंगल उभारणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात मंत्री विश्वजीत राणे यांच्यासह आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामू शिरोडकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमात उपस्थितांनी लोकांशी संवाद साधला. या प्रकल्पासाठी सोनसडो यार्डाची निवड करण्यात आली. हे पूर्ण झाल्यानंतर यामागील कचराही साफ करण्यात येणार आहे. मडगावपासून याची सुरुवात होत असून शहरी भागात घनदाट जंगल उभारणी संकल्पना अस्तित्वात येणार आहे. याला सहकार्य करण्याची गरज आहे, असे यावेळी आमदार कामत म्हणाले.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या