Home / News / उद्धव ठाकरे बीडसह परभणी दौऱ्यावर जाणार

उद्धव ठाकरे बीडसह परभणी दौऱ्यावर जाणार

मुंबई- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बीड आणि परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत. या दौर्याची न्मकी चारीख ठरली नसली तरी ते २ किंवा ३ जानेवारीला बीड-परभणीला जातील, अशी शक्यता असल्याचे खा. संजय राऊत यांनी आज सांगितले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.