Home / News / ओमराजे निंबाळकरांवर निवडणूक आयोगाची कारवाई

ओमराजे निंबाळकरांवर निवडणूक आयोगाची कारवाई

धाराशिव- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. मतमोजणी केंद्रात अंगरक्षकांसह प्रवेश केल्याने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले होते. त्यात मतमोजणी केंद्रात आमदार कैलास पाटील व उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर हे नियमाला डावलून अंगरक्षकासह वावर करत होते हे सीसीटीव्ही पाहून स्पष्ट झाले, त्यानंतर त्यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.