Home / News / कडेगावमध्ये मोहरमच्याताबूत भेटीचा सोहळा संपन्न

कडेगावमध्ये मोहरमच्याताबूत भेटीचा सोहळा संपन्न

कडेगावहिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या आणि तब्बल २०० वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावमध्ये मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि...

By: E-Paper Navakal

कडेगावहिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या आणि तब्बल २०० वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावमध्ये मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा आज सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्यासह कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते.आज सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करून सकाळी 11 वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलून सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातभाई-पाटील- बागवान- अत्तार- हकीम, देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी ११.३० वाजता संपन्न झाल्या.

Web Title:
संबंधित बातम्या