Home / News / कर्जतच्या आदिवासीवाडीत दूषित पाण्याने अतिसार लागण

कर्जतच्या आदिवासीवाडीत दूषित पाण्याने अतिसार लागण

कर्जत- तालुक्यातील गौरकामथ गावातील आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी-प्राणी पडून मेल्याने हे पाणी दूषित झाले आहे.हे दूषित पाणी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कर्जत- तालुक्यातील गौरकामथ गावातील आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी-प्राणी पडून मेल्याने हे पाणी दूषित झाले आहे.हे दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे.या रुग्णांना उलट्या जुलाब होत असल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

गौरकामथ आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले की,आमच्या गावातील पाण्यात कावळा,बेडूक, सरडा व उंदीर असे पक्षी-प्राणी मरून पडले आहेत. हे दूषित पाणी प्यायल्याने सुमारे १५ जण आजारी पडले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना उलट्या जुलाब असा त्रास होत आहे. त्यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.तसेच या रुग्णालयात २५ खाटा अशा साथीच्या रुग्णांसाठी उपलब्ध असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय म्हसकर यांनी दिली.

Web Title:
संबंधित बातम्या