कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर स्कूलबसच्या क्लीनरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात करण दीपक पाटील (24) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, बदलापूरमधील भयंकर प्रकाराची पुनरावृत्ती झाली असल्याचे बोलले जात आहे.
पीडित मुलींच्या आईने सांगितले की, आरोपी करण पाटील हा मुलींना बसमधील ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसायला सांगत असे आणि त्यानंतर त्यांच्या शरीराच्या खासगी भागांना स्पर्श करीत असे. मुलींनी विरोध केला, तर त्यांना मारहाणही केली जात असे. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता. याबाबत मुलींनी आज आम्हाला घरी आल्यावर सांगितले. आम्ही तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर नराधम करण पाटीलला वाचवण्यासाठी एका राजकीय नेत्याने पोलीस ठाण्यात अवैध जमाव गोळा करून पीडित आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे. त्याबरोबर स्कूलबसच्या व्यवस्थापनाची आणि बस मालक कमलेश ठाकरे याचीही सखोल चौकशी करण्यात यावी.
आज मनसे कार्यकर्त्यांनी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा. या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन दिले. या घटनेची दखल घेऊन कर्जत गटशिक्षण अधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील सर्व शाळा तसेच स्कूल बसेसचे मालक तसेच शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक सोमवारी
ठेवली आहे.
