Home / News / कामाच्या ताणाला कंटाळून चक्क ‘रोबोट ‘ची आत्महत्या !

कामाच्या ताणाला कंटाळून चक्क ‘रोबोट ‘ची आत्महत्या !

नवी दिल्ली – दक्षिण कोरियात एका आत्महत्येची घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. कारण या देशात कुणा मानवाने नव्हे तर चक्क एका रोबोटने आत्महत्या केली आहे.विशेष म्हणजे कामाच्या ताणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

हा रोबोट गुमी शहरातील महापालिकेच्या कामात मदत करत होता. गेल्या वर्षभरापासून हा रोबोट त्या ठिकाणी नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करायचा. मात्र गेल्या आठवड्यात हा रोबोट पायऱ्यांच्या खाली बेशुद्धावस्थेत म्हणजेच निष्क्रिय अवस्थेत पडलेला सापडला.एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबोट पायर्‍यांवरून पडण्याच्या आधी एखाद्या निराश माणसासारखा इकडे तिकडे घुटमळत फिरत होता. आता असे सांगितले जात आहे की, हा रोबोट कामाच्या ताणामुळे तणावात होता आणि त्यामुळेच त्याने पायर्‍यांवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याठिकाणी नेमकी काय परिस्थिती उद्भवली होती याचा तपास केला जाणार आहे. रोबोटचे विखुरलेले पार्ट एकत्र करण्यात आले आहेत. या रोबोटला ज्या कंपनीने बनवले आहे ती कंपनीही यावर आता अभ्यास करणार असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हा रोबोट कॅलिफोर्नियाच्या बिअर रोबोटिक्सद्वारे बनविला होता. तो दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचा. हा रोबोट लिफ्ट बोलवू शकत होता. तो अनेक पायर्‍यांवरून येजा करायचा. जगातील सर्वांत जास्त रोबोटचा वापर हा दक्षिण कोरियात केला जातो. या देशात १० कर्मचाऱ्यांमागे एक रोबोट असतो.