केरळमध्ये १४ वर्षांच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण

तिरुवनंतपुरम-केरळ राज्यातील मलप्पुरममधील एका १४ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.या पार्श्‍वभूमीवर
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली मलप्पुरम जिल्ह्यात उच्चस्तरीय बैठक झाली.यामध्ये निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

निपाह विषाणूची लागण झालेल्या युवकाचे नमुने पुण्याच्या व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे.त्याची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले जाऊ शकते. तत्पूर्वी, मंत्री वीणा जॉर्ज यांनी जाहीर केले की,सप्टेंबरमध्ये निपाह व्हायरस रोखण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले जातील.लोकांनी वटवाघळांचा अधिवास नष्ट करू नये.कारण त्यांना त्रास दिल्याने विषाणूचा संसर्ग वाढू शकतो.लोकांनी पक्ष्यांनी अर्धवट खाल्लेली फळे खाऊ नयेत. प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा विषाणू घातकही ठरू शकतो.