Home / News / कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणकर्त्या अर्जुनला अटक

कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणकर्त्या अर्जुनला अटक

मेरठ – अभिनेता मुश्ताक खान अपहरण प्रकरणात बिजनौर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती.त्यानंतर कॉमेडियन सुनील पाल अपहरण प्रकरणात मेरठ...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मेरठ – अभिनेता मुश्ताक खान अपहरण प्रकरणात बिजनौर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती.त्यानंतर कॉमेडियन सुनील पाल अपहरण प्रकरणात मेरठ पोलिसांनी मुख्य आरोपी लवी पालचा जवळचा मित्र अर्जुन कर्णवालला अटक केली. अर्जुनकडून अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ कार,२ लाख रुपये आणि खंडणीसाठी वापरलेला मोबाइल जप्त केले आहेत.
अर्जुनने पोलिसांना सांगितले की, लवी पाल त्याला कोणाचे अपहरण करायचे, किती खंडणी वसूल करायची यासंदर्भात काम नेमून द्यायचा. परंतु घटनेचे सर्व सूत्र व माहिती त्यालाच होती. मुख्य आरोपी लवी पालने बिजनौरच्या गल्लीबोळातून कमी शिकलेल्या मित्रांची एक टोळी तयार केली. हे आरोपी छोट्या कलाकारांना कार्यक्रमाला बोलवून दिल्ली विमानतळावरून त्यांचे अपहरण करायचे. त्यांच्याकडून दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत खंडणी वसूल करायचे. या टोळीने अरुण बक्षी, राजेश पुरी, मुश्ताक खान, सुनील पाल या कलाकारांचे अपहरण करून पैसे वसूल केले. अटक आरोपींनी पुढील एक वर्षासाठी बनावट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची योजना आखली होती .

Web Title:
संबंधित बातम्या