Home / News / कोळीवाड्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ देणार नाही!आदित्य ठाकरेंचा इशारा

कोळीवाड्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ देणार नाही!आदित्य ठाकरेंचा इशारा

मुंबई – शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीवरून मिंधे सरकारवर हल्लाबोल केला. आहे. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच दिवशी मिंधे सरकारच्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी करू असे आश्वासन दिले आहे. तसेच कोळीवाड्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ देणार नाही, असाही इशारा सरकारला दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळी, वर्सोवा, कुलाबा, सायन, जुहू, मड, वांद्रे, धारावी ज्या ठिकाणी कोळीवाडे आहेत त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचे सरकारने ठरवले आहे. ज्यांची एकरात जागा आहे, त्यांना एका इमारतीत घरे देऊन कोंडले जाणार आहे. चांगली आणि समुद्राची जागा बिल्डरला दिली जाणार आहे. ज्या आमदारांच्या मतदारसंघात कोळीवाडे येतात. त्यांची क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत काय भूमिका आहे ते स्पष्ट करायला हवे.
ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी शिंदे गट आणि भाजपासाठी बनवण्यात आली असून सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी बनवलेली नाही. तर कोणातरी बिल्डरने बनवली आहे. हे लोकांसमोर येणे आवश्यक आहे. ठाकरे गटाकडून आश्वासन देतो की, क्लस्टर डेव्हलपमेंट आम्ही होऊ देणार नाही, तर सेल्फ रिडेव्हलपमेंट करून कोळी बांधवांची घरे जशीच्या तशी ठेवणार.तर मविआचे सरकार आल्यावर या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची आम्ही होळी करू.