गणपतीसाठी एसटीने अडीच लाख प्रवासी कोकणात

मुंबई – कोकणात गणेशोस्तव हा सण जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून यंदा ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान पाच हजार गाड्या सोडण्यात आल्या. त्यामधून अडीच लाखापेक्षा अधिक प्रवासी कोकणात गेले आहेत. कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढले आहेत.