मुंबई- मुंबई महापालिका पालिका कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतीच पालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली.राज्य सरकारच्या धर्तीवर पालिका अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.त्यामुळे विविध भत्त्यांमध्ये वाढ होणे गरजेचे होते.ही वाढ देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.मात्र आता ही भत्त्यांची मिळणारी थकबाकी गणपती सणाच्या आधी मिळावी, असा आग्रह कर्मचारी संघटनांनी धरला आहे.त्याला आयुक्तांनी होकार दिला आहे.पण अधिकृत घोषणा केलेली नाही.त्यामुळेच पालिका कर्मचारी या थकबाकीकडे डोळे लावून आहेत. ही थकबाकी अपेक्षित वेळेत मिळेल अशी त्यांना आशा वाटते .
