Home / News / गुगलमध्ये १० टक्के नोकर कपात सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा

गुगलमध्ये १० टक्के नोकर कपात सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा

वॉशिंग्टन – गुगल कंपनी वरीष्ठ स्तरावर १० टक्के कर्मचारी कपात करणार आहे,अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वॉशिंग्टन – गुगल कंपनी वरीष्ठ स्तरावर १० टक्के कर्मचारी कपात करणार आहे,अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी केली आहे. या कर्मचारी कपातीमध्ये प्रामुख्याने संचालक, उपाध्यक्ष अशा दर्जाच्या पदांवर काम करीत असलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल,असे पिचाई यांनी सांगितले.पिचई यांच्या या घोषणेची माध्यमांमध्ये चर्चा आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात गुगल कंपनीने आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. कंपनीचे व्यवस्थापन सुलभ व्हावे आणि कंपनी अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने हे बदल केले आहेत. या सुधारणांचा एक भाग म्हणून गुगल कर्मचारी कपात करीत आहे,असे वृत्त आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिले आहे.याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये गुगलने मोठी कर्मचारी कपात करताना १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत ओपन एआयसारख्या कंपन्यांमुळे गुगलला फटका बसला आहे.त्यामुळेच या स्पर्धेत टिकण्यासाठी गुगल व्यवस्थापन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या