Home / News / गोव्यातील सत्तरी तालुक्यात धबधब्यांवरील बंदी उठवली

गोव्यातील सत्तरी तालुक्यात धबधब्यांवरील बंदी उठवली

पणजी- एक महिन्यांपूर्वी मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने बंदी घातली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ही...

By: E-Paper Navakal

पणजी- एक महिन्यांपूर्वी मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने बंदी घातली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. मात्र, धबधबा परिसरात प्रदूषण होणार नाही याची दखल घ्यावी,अशी सूचना करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाली-सत्तरी तालुक्यातील धबधब्यांवर धोक्याची तीव्रता कमी झाली आहे.त्यामुळेच वन खात्याने सर्व १४ धबधब्यांवरील बंदी उठवली आहे.मात्र धबधब्यांवर जाण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पर्यटकांनी धबधबे आणि अभयारण्य क्षेत्रांमध्ये प्लास्टिकचा कचरा होणार नाही,याचीही काळजी घ्यावी,अशी सूचना वन खात्यातर्फे करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या