त्रिवेंद्रम – घरात प्रसुती होताना पत्नीचा मृत्यू झाल्या प्रकरणी पोलिसांनी पतीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक केली. महिलेच्या पतीचे नाव सिराजुद्दिन असे आहे. तो स्वयंघोषित मुस्लीम मौलवी आहे. युट्यूबवर त्याचे चॅनल आहे. या चॅनलचे ६५ हजार सबस्क्रायबर आहेत.त्याच्या अटकेने खळबळ उडाली आहे.
सिराजुद्दिन मदावूर कफिला नावाचे युट्यूब चॅनल चालवतो. त्याच्या चॅनलवर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मलप्पुरम पोलिसांनी त्याला भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा आणि कलम २३८ अन्वये पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने पत्नीला रुग्णालयात नेण्यास नकार देत घरातच प्रसुती करण्याचा आग्रह धरला होता .
महिलेचा मृत्यू प्रसुतीनंतर झालेल्या रक्तस्त्रावामुळेच झाला असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर तपासामध्ये मिळालेल्या अन्य माहितीच्या आधारे आम्ही सिराजुद्दिन याला अटक केली आहे,असे मलप्पुरम पोलिसांनी सांगितले.