बिजींग – चीनने आपल्या अवकाशातील अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या तीन अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहेत. सध्या अंतराळ स्थानकावर असलेले तीन अंतराळवीर परत येणार असून त्यांच्या जागी हे अंतराळवीर जाणार आहेत. ते पुढील सहा महिन्यांसाठी अंतराळ स्थानकात राहणार आहेत.चीनच्या शेंजों २० या अंतराळ मोहिमेसाठी ही नावे जारी करण्यात आली आहेत. यामध्ये चेन डाँग, चेन झोंगरुल व वॅन्ग जे यांचा समावेश आहे. चीनच्या अंतराळ संशोधन केंद्राचे प्रमुख लिन झिग्लांग यांनी ही माहिती दिली. हे तीन्ही अंतराळवीर उद्या झिकुन अवकाश स्थळावरुन अंतराळाच्या दिशेने झेपावणार आहेत. या आधी ऑक्टोबर महिन्यात तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात गेले होते. अंतराळातील १७५ दिवसांच्या मुक्कामानंतर ते लवकरच परत येणार आहेत. चेन डाँगे हे या चमूचे नेतृत्व करणार आहेत. या चमुत वायुदलाच्या वैमानिकाचाही समावेश करण्यात आला आहे.