चीनमध्ये जगातील सर्वात उंच पूल एका तासाचा प्रवास एका मिनिटात

बिजिंग – जगातील सर्वात उंच पुलाची उभारणी चीनने केली असून येत्या जून महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. दोन मैल लांबीच्या या पुलामुळे एका तासाचा प्रवास अवघ्या एका मिनिटात करता येणार आहे.
हुआजियांग ग्रँड कॅन्यन असे या पुलाचे नाव आहे. या पुलाची उंची पॅरीसच्या आयफेल टॉवरपेक्षा दोनशे मीटरने जास्त आहे.तर वजन आयफेल टॉवरच्या तिप्पट आहे. २ हजार २०० कोटी रुपये खर्चून अभियांत्रिकीचा हा अजोड नमूना उभारण्यात आला आहे.
हा महत्वाकांक्षी प्रकल्प चीनच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्याचे दर्शन घडविणारा आहे. जगभरातील पर्यटकांसाठी हे एक आकर्षण ठरणार आहे,असे चीनचे मंत्री झांग शेगलिंग यांनी सांगितले.