चीनमध्ये यंत्रमानवाची अर्ध मॅरेथॉन शर्यत

बिजींग – कृत्रिम बुद्धीमत्ता व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या विविध यंत्रमानवांची एक अर्ध मॅरेथॉन शर्यत चीनमध्ये आयोजित करण्यात आली. या शर्यतीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.चीनच्या बिजींगमध्ये आज झालेल्या या मॅरेथॉनमध्ये अनेक यंत्रमानवांनी भाग घेतला. या यंत्रमानवांनी एकूण २१ किलोमीटरचे अंतर पार केले. यामध्ये काही यंत्रमानव हे अगदी लहान म्हणजे १२० सेंटीमीटरचे होते तर सर्वात मोठा यंत्रमानव हा १.८ मीटर उंचीचा होता. काही यंत्रमानवांची रचना ही मानवी शरीराप्रमाणे होती. प्रेक्षक व यंत्रमानवांना नियंत्रित करणारेही या मॅरेथॉनमध्ये सामील झाले. कृत्रिम बुद्धीमत्ता व रोबोटिक्सची ही शर्यत अनोखी असल्याची प्रतिक्रीया प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.