मुंबई- देशभरात वाढत्या महागाईने कहर केला आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत थेट ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने चेंबूरमधील खारदेवनगर सावली नाका येथे जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे चेंबूर तालुकाध्यक्ष दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी पक्ष
कार्यकर्त्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी खारदेवनगर भाजी मार्केट येथून सावली नाक्यापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला.या मोर्चामध्ये प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे,भालचंद्र दळवी,
जगदीश दया,भालचंद्र पाटील,प्रवीण घाडगे,वंदना सावंत, सायली पेडणेकर,
रत्नप्रभा मेजारे, योगिता भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.