धाराशिव- चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर ११ ते १५ एप्रिल या कालावधीत रोज २२ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, चैत्र पौर्णिमा यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. एकाच वेळी प्रचंड मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थानच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. यात्रा कालावधीत ११ ते १५ एप्रिल दरम्यान तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिर पहाटे ४ ला उघडण्यात येणार असून सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ करण्यात येणार आहे