Home / News / छत्तीसगडमधील चकमकीत १० नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील चकमकीत १० नक्षलवादी ठार

सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस दलाची नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले असून सुरक्षादलाने त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

पोलीस अधिकारी किरण चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, सुकमा जिल्ह्यातील भेज्जी भागातील जंगलात ही चकमक झाली. या ठिकाणी अनेक नक्षलवादी आल्याची गुप्त माहिती आल्यानंतर पोलिसांनी आज पहाटे कारवाईला सुरुवात केली. हे नक्षली ओदिशामधून छत्तीसगडमध्ये येत असताना पोलीस व नक्षलींमध्ये ही चकमक झाली. पोलिसांनी नक्षलींकडून तीन स्वयंचलित बंदुकांबरोबरच इतर अनेक शस्त्रात्रे जप्त केली आहेत.