जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून धावली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस

Vande Bharat Express: जम्मू-कश्मीरसाठी वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा आता संपली आहे. जगातील सर्वात उंच पुलावरून धावत या ट्रेनने ट्रायल यशस्वीरीत्या पूर्ण केले. आहेकटरा आणि बडगाम रेल्वे स्थानकादरम्यान हे अंतर रेल्वेने ट्रायल दरम्यान पूर्ण केले. ट्रायल दरम्यान ही ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीज आणि भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे ब्रीज असलेल्या चिनाब ब्रिजवरून देखील धावली. या वंदे भारत एक्सप्रेसला खास जम्मू-कश्मीरसाठी डिझाइन करण्यात आले आहे.

जम्मू-कश्मीरमधील थंड हवामानतही प्रवाशांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी या वंदे भारत एक्सप्रेसला खास डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये खास हीटिंग प्रणाली देण्यात आली असून, यामुळे ट्रेनच्या काचांवर बर्फ जमा होत नाही. -30 डिग्रीमध्ये देखील ही रेल्वे कोणत्याही समस्येशिवाय सहज धावू शकते.

ही ट्रेन पुढील महिन्यापासून नियमित प्रवासासाठी धावण्याची शक्यता आहे. ट्रेन 160 किमी अंतर केवळ 3 तास 10 मिनिटांमध्ये पूर्ण करेल. ट्रेन माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर दरम्यान धावेल. यामध्ये प्रवाशांना थंडीचा सामना करावा लागू नये म्हणून बाथरूममध्ये देखील हीटर बसवण्यात आले आहेत.

यामध्ये प्रमाणे विमानाप्रमाणे सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना यात 360 ड्रिगी सीट्स, चार्जिंग प्‍वाइंट, एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात जाण्यासाठी ऑटोमेटिक दरवाजे, मनोरंजनसाठी स्क्रीन, बायो वॅक्यूम टॉयलेट्स देण्यात आले आहेत. तसेच, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या ट्रेनच्या तिकिट किंमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रवासासाठी प्रवाशांकडून 1500 ते 2500 रुपयांपर्यंत तिकिटाची किंमत असू शकते.