Home / News / जम्मू-काश्मीर मधील डोडामध्ये चकमकीत दहशतवादी जखमी!

जम्मू-काश्मीर मधील डोडामध्ये चकमकीत दहशतवादी जखमी!

डोडा – जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील पटनीटॉप जंगलात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोध...

By: E-Paper Navakal

डोडा – जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील पटनीटॉप जंगलात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोध मोहिमेदरम्यान परिसरातून एम-४ रायफल, कपडे आणि तीन रक्सॅक बॅग जप्त केल्या आहेत. दहशतवादी अकर भागातील एका नदीजवळ लपले आहेत. गेल्या पाच दिवसांतील ही चौथी चकमक आहे.

जम्मू विभागातील डोडा जिल्ह्याच्या उंच भागात १२ जूनपासून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक चकमकी झाल्या आहेत. ज्यात एक कॅप्टन आणि तीन परदेशी दहशतवाद्यांसह चार सैनिकांचा मृत्यू झाला, काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. ११ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता. तर १० ऑगस्ट रोजी कोकरनाग, अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ हवालदार शहीद झाले तर 3 सैनिक आणि २ नागरिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवले आहे. जम्मू भागात ३००० हून अधिक लष्कराचे जवान आणि २००० बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दहशतवादाचा सामना करण्यासाठी आसाम रायफल्सचे सुमारे १५००-२००० सैनिकही तैनात केले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या