Home / News / डीजेवर बंदी आणापोलिसांकडे मागणी

डीजेवर बंदी आणापोलिसांकडे मागणी

पुणे – डीजे आणि लेजर लाईटचा मानवाच्या आरोग्यास परिणाम होतो. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी पुणेकरांनी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यात, पुढील ६० दिवस शहरात लेझर दिवे वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचे परिपत्रक पोलिसांकडून काढण्यात आले होते. असे परिपत्रक असताना, दोन दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा अमर्याद वापर करण्यात आल्याची आठवण करून देण्यात आली आहे.