Home / News / ड्रग्जच्या वाढत्या व्यापाराची सर्वोच्च न्यायालयाला चिंता

ड्रग्जच्या वाढत्या व्यापाराची सर्वोच्च न्यायालयाला चिंता

नवी दिल्ली- देशातील ड्रग्जच्या वाढत्या वापरावर आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. ५०० किलो हेरॉईनच्या तस्करी प्रकरणातील आरोपीच्या जामीन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- देशातील ड्रग्जच्या वाढत्या वापरावर आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. ५०० किलो हेरॉईनच्या तस्करी प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही चिंता व्यक्त केली आहे.
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीवी नागरला व न्यायमूर्ती एन कोटिस्वर सिंह यांच्या पीठाने म्हटले आहे की, अंमली पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही. देशातील अंमली औषधांचा अनधिकृत व्यापाराची चिंता वाटते. अंमली पदार्थांचे सेवन करणे एक सवय सून या विरोधात खुली चर्चा करणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा वापर हा एक सामाजिक, आर्थिक व मानसिक धोका आहे. युवकांमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या सेवनावर तत्काळ सामुहिक कारवाई केली पाहिजे. पालक, समाज व सरकारने एकत्र येऊन या संकटावर तोडगा काढला पाहिजे. आम्ही या मुद्द्यावर शांत राहतो त्याचा फायदा दहशतवादी व हिंसेला प्रोत्साहन देणारे घेत असतात. या नशेच्या गर्तेत अडकलेल्या युवकांकडे सहानुभूतीपूर्वक पाहायला हवे.

Web Title:
संबंधित बातम्या