Home / News / दिल्लीत शीतलहर हवामानाचा अंदाज

दिल्लीत शीतलहर हवामानाचा अंदाज

नवी दिल्ली- राजधानी नवी दिल्लीसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस शीतलहर येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- राजधानी नवी दिल्लीसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस शीतलहर येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे दिल्लीतील तापमान साडेचार अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
हिमालयातील डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून त्यामुळे दिल्लीतील तापमानही खाली येणार आहे. पुढील दोन आठवडे थंडी राहणार असून १५ जानेवारीनंतर हिवाळा संपणार आहे. या शीतलहरीचा फटका जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, सह उत्तर प्रदेशच्या मैदानी भागांनाही बसणार आहे. बर्फवृष्टी थांबल्यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या