‘द नोटबुक’च्या अभिनेत्रीगेना रोलँड्स यांचे निधन

न्यूयॅार्क – ‘द नोटबुक’ अभिनेत्री गेना रोलँड्स यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. फॅन्स आणि सिनेमाजगतातील तमाम कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गेना रोलँड्स यांना अल्झायमर आजार होता. त्या इंडियन वेल्स, कॅलिफोर्नियामध्ये राहात होत्या.गेना यांचा जन्म जून १९३० मध्ये विस्कॉन्सिनमध्ये झाला होता. अभिनय करिअरची सुरुवात १९५० च्या दशकात केली. द सेवन ईयर इचमधून त्यांनी ब्रॉडवेवर पदार्पण केले. नंतर त्या टीव्हीकडे वळल्या. १९५८ मध्ये द हाय कॉस्ट ऑफ लव्हिंगमध्ये अभिनय केला होता. हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘द नोटबुक’ हा २००४ मध्ये आलेला चित्रपट मुलगा निक कॅसावेट्सने दिग्दर्शित केला होता. ‘द नोटबुक’मधील गेना रोलँड्स यांच्या अभियनाचे खूप कौतुक झाले. चार एमी, दोन गोल्डन ग्लोब आणि दोन ऑस्कर नामांकने जिंकल्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये अभिनय सोडला . २०१५ मध्येच त्यांना दीर्घ अभिनय कारकिर्दीसाठी विशेष अकादमी पुरस्कार देण्यात आला.