Home / News / नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये ढोल वाजवत आनंद लुटला

नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये ढोल वाजवत आनंद लुटला

सिंगापूर – सिटीब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले. चांगी विमानतळावर त्यांचे भारतीय समुदायाच्या लोकांनी ढोल वाजवत जंगी...

By: E-Paper Navakal

सिंगापूर – सिटीब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले. चांगी विमानतळावर त्यांचे भारतीय समुदायाच्या लोकांनी ढोल वाजवत जंगी स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनीही स्वत: ढोल वाजवत आनंद लुटला. नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा सिंगापूर दौरा आहे.चांगी विमानतळावर काही लोकांनी मोदींना भगव्या रंगाचा गमछा भेट दिला. काहींनी नरेंद्र मोदींसोबत सेल्फीही काढले. यावेळी एका महिलेने मोदींना राखीही बांधली. सिंगापूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार, त्या हॉटेलच्या बाहेरही लोकांची मोठी गर्दी केली होती. उद्या सिंगापूरच्या संसद भवनात मोदींचे अधिकृत स्वागत करण्यात येणार आहे. त्यासोबत नरेंद्र मोदी सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम, पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. सिंगापूरमधील व्यापारी समुदायाच्या प्रतिनिधींशी मोदी संवाद साधतील.

Web Title:
संबंधित बातम्या