नाशिकमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद

नाशिक -नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात विविध जलशुद्धीकेंद्रांवर कामे हाती घेतल्याने ३० नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवार १ डिसेंबरलादेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे दोन दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.