Home / News / नासाचे चार अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले

नासाचे चार अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाची आणखी एक अंतराळ मोहीम आज यशस्वी झाली. एन्डेव्हर नावाचे नासाचे अंतराळ यान चार...

By: E-Paper Navakal

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाची आणखी एक अंतराळ मोहीम आज यशस्वी झाली. एन्डेव्हर नावाचे नासाचे अंतराळ यान चार अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर पोहोचले.क्रू -८ ड्रॅगन एन्डेव्हर नावाची ही अंतराळ मोहीम खरेतर कमी कालावधीसाठी आखण्यात आली होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम लांबली.आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर तब्बल २३३ दिवस वास्तव्य करून चार अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले.मॅथ्यू डॉमिनिक, मायकल बॅरेट, जेनेट एप्स आणि अलेक्झांडर ग्रेबेनकिन (रशिया) अशी त्यांची नावे आहेत.अवकाश तळावरील वास्तव्यादरमान्य अंतराळवीरांनी मानवी जीवनाशी निगडीत विविध क्षेत्रांशी संबंधित सुमारे दोनशे प्रयोग केले आहेत. समग्र मानव जातीच्या कल्याण हा या मोहिमेचा उद्देश होता.

Web Title:
संबंधित बातम्या