Home / News / नॉयडा एक्सप्रेसवेवर अपघातात ५ जण ठार

नॉयडा एक्सप्रेसवेवर अपघातात ५ जण ठार

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात नॉयडा ग्रेटर नॉयडा एक्सप्रेसवेवर आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात नॉयडा ग्रेटर नॉयडा एक्सप्रेसवेवर आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला कार धडकल्याने हा अपघात घडला.नॉयडा एक्सप्रेसवेवर एक बंद पडलेला ट्रक उभा होता. त्याचवेळी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक कार या ट्रकला पाठीमागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यातील मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

Web Title:
संबंधित बातम्या