Home / News / पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये जी २० परिषदेत सहभागी

पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये जी २० परिषदेत सहभागी

रिओ दे जिनेरिओ – पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेसाठी ब्राझीलमधील रिओ दि जिनेरिओमध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी ते नायजेरियात होते....

By: E-Paper Navakal

रिओ दे जिनेरिओ – पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेसाठी ब्राझीलमधील रिओ दि जिनेरिओमध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी ते नायजेरियात होते. नायजेरियामध्ये झालेल्या स्वागतामुळे आपण भारावून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.जी २० परिषदेत ते जगातील अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार असून परिषदेलाही संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षीच्या जी २० परिषदेचे यजमानपद भारताने भूषवले होते. आज रिओ दि जिनेरियोमध्ये अनेक नेते उपस्थित झाले आहेत. या परिषदेच्या सुरुवातीलाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग व ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. २०१८ नंतर पहिल्यांदाच चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या