Home / News / पतीने उघड केले आपल्या लाचखोर पत्नीचे पुरावे

पतीने उघड केले आपल्या लाचखोर पत्नीचे पुरावे

हैद्राबाद – महानगर पालिकेत सहाय्यक अभियंता पदावर काम करणाऱ्या आपल्या पत्नीचे कारनामे तिच्याच पतीने उघड केल्याचा प्रकार हैद्राबाद मध्ये घडला...

By: Team Navakal

हैद्राबाद – महानगर पालिकेत सहाय्यक अभियंता पदावर काम करणाऱ्या आपल्या पत्नीचे कारनामे तिच्याच पतीने उघड केल्याचा प्रकार हैद्राबाद मध्ये घडला आहे. पत्नीबरोबर झालेल्या बेबनावाचा बदला अशा पद्धतीने पतीने घेतला असून घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर त्याने ही पोलखोल केली.

श्रीपाद नावाच्या पतीने त्याची पत्नी दिव्यज्योती मणिकोंडा हिची पोलखोल केली असून त्याने घरात पत्नीने आणलेल्या पैशांचा व्हिडिओच व्हायरल केला आहे. या व्हिडिओत घराच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या नोटा त्याने दाखवल्या आहेत. या व्हिडिओत त्याने देवघरात, कपाटात, बॅगेमधील नोटांची अनेक बंडले अस्ताव्यस्त पडलेली दाखवली आहेत. पत्नीला जेव्हा जेव्हा कामाविषयी विचारत होतो तेव्हा ती आपला अपमान करत होती. शिवीगाळ करत होती त्यामुळे आपण हे कृत्य केल्याचे त्याने म्हटले आहे. हे पुरावे त्याने माध्यमांनाही दिले आहेत. यामुळे आता पत्नीची नोकरी धोक्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या