पीएम किसान योजनेच्या लाभार्थींच्या यादीत तुमचे नाव कसे तपासाल? जाणून घ्या

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान निधी योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत. लवकरच, योजनेचा 19वा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही.

ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेतकरी pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन ई-केवाईसी करू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही.

लाभार्थींच्या यादीत तुमचे नाव कसे तपासावे?

तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकता. यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल.

  • यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • त्यानंतर Farmers Corner सेक्शनमध्ये जाऊन Beneficiary List वर क्लिक करा.
  • आता तुमचा राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गावाचे नाव इत्यादी माहिती निवडा.
  • त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
  • यानंतर समोर आलेल्या यादीत तुमचे नाव तपासू शकता.

या योजनेशी संदर्भाती कोणतीही समस्या असल्यास तुम्ही pmkisan-ict@gov.in या इमेल आयडीवर संपर्क करू शकता. याशिवाय, 155261 आणि 1800115526 (Toll Free) आणि 011-23381092 या क्रमांकावर वर देखील संपर्क करता येईल