पुण्याच्या हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

पुणे – पुण्याच्या हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील ३ मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत तिसर्‍या मजल्यावर २ जण अडकले होते. स्थानिकांनी त्या दोघांना इमारतीच्या गॅलरीमधून बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.