Home / News / पुण्यात अमुलचा आइसक्रीम उत्पादन महिनाअखेरीस सुरु

पुण्यात अमुलचा आइसक्रीम उत्पादन महिनाअखेरीस सुरु

पुणे- देशातील आघाडीची दुग्धउत्पादन संस्था असलेल्या अमुलचा पुणे जिल्ह्यातील आइसक्रीम प्रकल्प या महिनाअखेरीस सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून येत्या ३१ ऑक्टोबर पासून आईस्क्रिमचे उत्पादन सुरु होणार आहे.
खेड येथील साडेअकरा एकर जागेत हा कारखाना उभारण्यात आला असून त्यातून दिवसाला १ लाख लिटर दुधाचे आइस्क्रिमचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी अमुलने १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशाच प्रकारचा आणखी एक प्रकल्प विरार येथेही सुरु होणार आहे. खेड येथील या प्रकल्पाचे भूमीपुजन ४ नोव्हेंबर २०२२ रोजी झाले होते. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच या ठिकाणाहून उत्पादन सुरु होणार आहे.

Share:

More Posts