पुण्यात आज पाणी पुरवठा बंद

पुणे – पुणे शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जोडणाऱ्या रॉ वॉटर लाईनमध्ये सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे गळती झाली आहे. ही लाईन फुटल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून उद्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. यात वारजे, शिवणे औद्याोगिक परिसर, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड या भागांचा समावेश आहे. दुरुस्ती कालावधीमध्ये टँकरने पाणिपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.