पुणे- पंढरपूर पुणे पालखी मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी आग लागली .पंढरपूर आगाराची ही बस पुण्याला निघाली होती. बस वाडीकुरोली गावा जवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवून सर्व प्रवाशांना बस बाहेर काढले. आगीमध्ये बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
