पेण -‘गणपतीचा गाव’ म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणच्या मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील मांडला परिसरात घरोघरी गणेश मूर्ती तयार केल्या जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह अचानक पडणाऱ्या पावसामुळे मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी अनेक कारखान्यांमध्ये तयार केलेल्या गणेशमूर्ती पाण्यात भिजल्या आहेत. मूर्तिकारांनी मेणकापड टाकून मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही अनेक मूर्तींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मूर्तिकारांची महिन्यांची मेहनत वाया जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीची दखल घ्यावी व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
याआधीही २०१९ साली जोहे आणि तांबडशेट गावांमध्ये अशाच प्रकारे पूर आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी अनेक मूर्ती वाहूनही गेल्या होत्या, ज्यामुळे मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका बसला होता.