प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठीभाविकांची नवी तुकडी रवाना

श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला.१,१९८ भाविक अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किमी लांब पारंपरिक मार्गाने पहलगामला पोहोचतील, तर ४५६ भाविकांनी गांदरबल जिल्ह्यातील १४ किमी लांबीचा बालटाल मार्ग निवडला आहे. यावर्षी आतापर्यंत ४.७ लाखांहून अधिक भाविकांनी ३,८८० मीटर उंच गुंफेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. २८ जून रोजी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी भाविकांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जम्मू बेस कॅम्पवरून १,४१,९४७ यात्रेकरू अमरनाथ गुंफेकडे रवाना झाले. ही यात्रा १९ ऑगस्टला संपणार आहे.