मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय चैतन्य कांचन कांबळे या तरुणाने प्रेमसंबंधाला विरोध होता म्हणून प्रेयसीचे वडील महेंद्र शहा यांची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र त्याने हत्येचा कट रचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
या हत्या प्रकरणात आरोपी चैतन्य कांबळे याने जामीनसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर न्या. अश्विन डी. भोबे यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी
न्यायालयाने म्हटले की, महेंद्र शहा यांच्यावर ७ ऑगस्ट २०२३ रोजी हल्ला लाकूड आणि फायबर रॉडने हल्ला झाला.या घटनेनंतर १६ महिन्यांनी म्हणजे ८ जानेवारी २०२५ रोजी शहा यांचा सेफ्टीक शॉकमध्ये मृत्यू झाला.या त्यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी चैतन्यला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर ३०२ कलमान्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.शहा यांच्या मुलीशी चैतन्यचे प्रेमसंबंध होते.शहा यांचा त्याला विरोध होता.या विरोधातूनच त्याने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. परंतु या गुन्ह्यात आरोपांचे स्वरुप आणि आरोपी चैतन्यची कोणतीही भूमिका नसल्याचे लक्षात घेता त्याला सतत तुरुंगात ठेवण्याची गरज नाही,असे निरीक्षण नोंदवित न्यायमूर्ती भोबे यांनी चैतन्यला जामीन मंजूर केला.