बरेली – उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एका बिअर फॅक्टरीतील बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकांनी ग्रामस्थांना आत जाऊ न दिल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत ५ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.बरेलीच्या इस्लामपूर गावातील एका बिअर फॅक्टरीचा बॉयलर फुटल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, बॉयलर फॅक्टरीपासून ५०० मीटर दूर असलेल्या एका शेतात जाऊन पडला. यावेळी शेतकरी गव्हाच्या शेतात काम करत होते. फॅक्टरीत अनेकांचे आप्त असल्याने त्यांनी धाव घेतली असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना परिसरात येऊ दिले नाही. या स्फोटाने फॅक्टरीच्या आत आग लागली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
