सॅमसंगने Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये नवीन गॅलेक्सी S स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. कंपनीने Samsung Galaxy S25, Samsung Galaxy S25 Plus, आणि Samsung Galaxy S25 Ultra ला लाँच केले आहे. Samsung Galaxy S25 ची किंमत 80,999 रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेल Galaxy S25 Ultra ची किंमत 1,65,999 रुपये आहे. या फोनमध्ये 12जीबीपर्यंत रॅम, पॉवरफुल कॅमेरा आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत
Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन 3 व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,29,999 रुपये, 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,41,999 रुपये आणि 12GB RAM आणि 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,65,999 रुपये आहे. फोनचे प्री बुकिंग 23 जानेवारीपासून सुरू झाले आहे. तर 7 फेब्रुवारीपासून फोनची विक्री सुरू आहे. फोनला तीन वेगवेगळ्या रंगात खरेदी करू शकता.
Samsung Galaxy S25 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 6.8 इंच Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला असून, यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि 2600 nits ब्राइटनेस मिळेल. हा फोन ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचरसोबत येतो. फोनमध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Armor ग्लास देण्यात आला आहे.
Samsung चा हा फ्लॅगशिप हँडसेट Qualcomm Snapdragon 8 Elite (3 nm) प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये Adreno 830 GPU देण्यात आला आहे. फोन 3 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजचा समावेश आहे.
Samsung Galaxy S25 Ultra क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात रियरला 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 3x ऑप्टिकल झूमसह येणारा 10MP टेलीफोटो कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूमसह येणारा 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 45W वायर चार्जर आणि 25W वायरलेस चार्जर सपोर्टसह 5000mAh ची दमदार बॅटरी मिळेल.