Home / News / भगवान श्रीकृष्णाच्या भ्रमणमार्गातील ३ हजार २०० मंदिरांचे संवर्धन होणार

भगवान श्रीकृष्णाच्या भ्रमणमार्गातील ३ हजार २०० मंदिरांचे संवर्धन होणार

भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने महत्वाकांक्षी श्रीकृष्ण पाथेय योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या भ्रमणमार्गातील ३ हजार २०० मंदिरांचे...

By: E-Paper Navakal

भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने महत्वाकांक्षी श्रीकृष्ण पाथेय योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या भ्रमणमार्गातील ३ हजार २०० मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने उजैनच्या ज्या सांदिपनी गुरुकुलमध्ये वयाच्या बाराव्या वर्षी धार्मिक शिक्षण घेतले त्या सांदिपनी गुरुकुलाच्या धर्तीवर एक विद्यापीठही उभारण्याची सरकारची योजना आहे.राज्याच्या सांस्कृतिक खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भगवान श्रीकृष्ण वयाच्या बाराव्या वर्षी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी उजैनच्या सांदिपनी गुरुकुलात दाखल झाले होते. पुढे श्रीकृष्ष्णाने राज्याच्या मालवा पट्टयात तीन यात्रा केल्या. पहिली यात्रा ही धार्मिक शिक्षण घेताना, दुसरी मित्राविंदाशी विवाह झाला तेव्हा आणि तिसरी यात्रा रुक्मिणीशी विवाह करताना केली असे मानले जाते. या तिन्ही यात्रा करताना भगवान श्रीकृष्णाने ज्या मंदिरांना भेट दिली त्या सर्व ३ हजार २०० मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या