Home / News / भारताची ‘समर २’ संरक्षण प्रणाली चाचणी डिसेंबरमध्ये

भारताची ‘समर २’ संरक्षण प्रणाली चाचणी डिसेंबरमध्ये

नवी दिल्ली- यंदाच्या डिसेंबरमध्ये ‘समर २’ या हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. तब्बल ३० किलोमीटरपर्यंत शत्रूचा अचूक वेध...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- यंदाच्या डिसेंबरमध्ये ‘समर २’ या हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. तब्बल ३० किलोमीटरपर्यंत शत्रूचा अचूक वेध घेणारी ही हवाई प्रणाली युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.

जमिनीवरून हवेत मारा करणारी ही हवाई संरक्षण प्रणाली दोन कंपन्यांच्या मदतीने विकसित केली आहे.यापूर्वी ‘समर १’ या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.या प्रणालीची रेंज ८ किलोमीटर इतकी आहे.रशियाच्या तंत्रज्ञानाच्या धर्तीवर ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
‘समर – १’ मध्ये आर-७३ क्षेपणास्त्र असून ‘समर -२’ मध्ये आर-२७ क्षेपणास्त्र आहे.

Web Title:
संबंधित बातम्या