सिडनी
ऑस्ट्रेलियाने भारताच्या ५ राज्यांतील विद्यार्थ्यांचा व्हिसा थांबवण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. व्हिसाचा दुरुपयोग आणि बनावट कागदपत्रांच्या घोटाळ्यानंतर ऑस्ट्रेलियाने मोठे पाऊल उचलले.
ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचा आरोप आहे की, ५ राज्यांतील विद्यार्थी शिक्षणाचा व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियात येतात. ते अभ्यासाकडेही दुर्लक्ष करतात.अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली पूर्णवेळ नोकरी करण्यास आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील विद्यापीठावर नकारत्मक परिणाम होत आहे.
ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया विद्यापीठ, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ,एडिथ कोवान विद्यापीठ, वोलोगोंग विद्यापीठ, टॉरेन्स विद्यापीठ या विद्यापीठांनी भारतातील ५ राज्यांतील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी घातली. काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अनेक निकष लावले आहेत.याआधी फेब्रवारी २०२३ मध्ये एडिथ कोवान विद्यापीठाने पंजाब आणि हरियाणातील विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नाकारला होता.
