भारतीय बाजारात लाँच झाली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाख; फीचर्स खूपच शानदार

Ferrato Defy 22 : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्सला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. ओला, इथरसह अनेक कंपन्या ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन नवनवीन स्कूटर्स लाँच करत आहेत. आता Ferrato या कंपनीने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Defy 22 ला भारतात लाँच केले आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Ferrato Defy 22 चे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स

Ferrato Defy 22 ला कंपनीने स्लीक आणि मॉडर्न डिझाइनसह सादर केले आहे. यामध्ये 12-इंच एलॉय व्हील्स दिले असून, जे स्कूटरला स्टायलिश लुक देतात. याचे फ्रंट एप्रन लांब आणि आकर्षक असून, त्यामध्ये हेक्सागोन-शेपचा LED हेडलॅम्प बसवण्यात आला आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शार्प साइड पॅनल्स, बल्की ग्रॅब रेल आणि युनिक टेललॅम्प डिझाइन दिले आहे. यात 7-इंच टचस्क्रीन स्पीडोमीटर देण्यात आला असून, ज्यात म्यूझिक फीचरचा देखील समावेश आहे. ही स्कूटर इको, सिटी आणि स्पोर्ट्स या तीन राइडिंग मोड्ससह येतो. यामध्ये आरामदायक राइडिंगचा अनुभव मिळावा यासाठी ड्युल लेव्हल फुटबोर्ड आणि 25 लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे.

यामध्ये 12-इंचचे एलॉय व्हील्स, कॉम्बी डिस्क ब्रेक सिस्टम, 220 मिमी फ्रंट डिस्क आणि 180 मिमी रियर डिस्क ब्रेक सिस्टम दिले आहेत. तसेच, फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरमध्ये दुहेरी शॉक अ‍ॅब्झॉर्बर सस्पेंशन मिळेल.

Ferrato च्या या स्कूटरमध्ये 1200W ची मोटर दिली असून, याची पीक पावर 2500W पर्यंत जाते. तर टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. या स्कूटरमध्ये 72V ची 30Ah (2.2 kWh) LFP बॅटरी दिली आहे. तसेच, IP65 रेटेड वेदरप्रूफ चार्जर देखील मिळतो. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर 80 किमी रेंज ऑफर करते.Ferrato Defy 22 ला शॅम्पेन क्रीम, ब्लॅक फायर, यूनिटी व्हाइट, कॉस्टल आयवरी, रिजिलेंस ब्लॅक, डोव ग्रे  आणि मॅट ग्रीन रंगात खरेदी करता येईल.