वॉशिंग्टन – मानवासाठी पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का हा सर्वाधिक कुतुहलाचा विषय आहे. त्या अनुषंगाने सातत्याने शोध सुरू आहेत. अशातच अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधकांना मंगळ ग्रहावर मानवी खोपडीसदृष आकृती आढळून आली आहे. नासाने मार्स रोव्हर पर्सिव्हियरन्सच्या साह्याने हे छायाचित्र टिपले आहे. नासाने याचे एक छायाचित्र शेअर केले आहे. छायाचीत्रातील वस्तु दगडाचा तुकडा असल्यासारखी दिसते. मात्र त्यावर मानवी तोंडासारखा आकार दिसत आहे. नासाने या छायाचित्राबद्दल अधिक तपशिल दिलेला नाही.
