मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी ६ एप्रिलला विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत राहील. या ब्लॉकदरम्यान बदलापूर ते कर्जत न्यू स्थानकांदरम्यानची उपनगरीय सेवा सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. याशिवाय, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५७ वाजता सुटणारी (एस-१७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल, सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ वाजता सुटणारी (एस-१९) सीएसएमटी-कर्जत लोकल, सीएसएमटी येथून सकाळी ११.१४ वाजता सुटणारी (एस-२१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल, ठाणे येथून दुपारी १२.०५ वाजता सुटणारी (टीएस-५) ठाणे-कर्जत लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२.२० वाजता सुटणारी (केपी-५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खोपोली लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच निघावे, असे आवाहन रेल्वे प्रशासाने केले आहे.